जर्मनीचे माजी चान्सलर कोल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली, दि. 18 - जर्मनीचे माजी चान्सलर हेलमट कोल यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे . भारत आणि जर्मनी या दोन देशांमधील संबंध घट्ट करण्यासाठी कोल यांनी योगदान दिले. भारत त्यांच्या या योगदानाचा सन्मान करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. कोल हे 1986 आणि 1993 साली भारतात आले होते, असेही त्यांनी नमूद केले.
कोल यांचे शुक्रवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. 1982 ते 1998 या कालावधीत ते जर्मनीचे चान्सलर होते. कोल यांनी जर्मनीच्या एकीकरणात महत्त्वाची भूमिका निभावली होती. हेलमट कोल यांचा जन्म 3 एप्रिल 1930 रोजी झाला. 1946 च्या काळात ते राजकारणात आले आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटीक युनियनमध्ये ते सामील झाले. 1990 च्या दशकात बर्लिन भिंत कोसळली आणि पूर्व- पश्चिम जर्मनी एकत्र आले. जर्मनीच्या एकत्रीकरणात हेलमट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जर्मनीच्या चान्सलर पदावर सर्वाधिक काळ (16 वर्ष) राहण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीने विकासाच्या दिशेने वाटचाल केली. कोल यांच्या निधनावर जगभरातील अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त केला गेला आहे.