Breaking News

योगाच्या दिवशी दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डेहराडून - आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी झालेल्या डेहराडूनमधील एका 72 वर्षीय महिलेचा आणि कर्नाटकमधील टेरडाल शहरातील 48 वर्षीय शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुधा मिश्रा या डेहराडूनच्या इंदिरानगरमधील रहिवासी घटनास्थळी म्हणजेच वन संशोधन संस्थेमध्ये बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आर. के. अहलुवालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसून आली होती. घटनास्थळी 30 डॉक्टर्स, 108 पॅरामेडिकल कर्माचारी आणि 27 रुग्णवाहिका होत्या.