Breaking News

परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे गुणवत्ता टिकून : चव्हाण



कोपरगाव / शहर प्रतिनिधी

सी. बी. एस. ई. बोर्ड नवीदिल्ली दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये कोपरगांव तालुक्यासह जिल्हयातील विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून आली. सातत्यपूर्ण व सर्वंकश मूल्यमापन (सी. सी. ई. ) ही पध्दत बंद झाल्याचा फारसा परिणाम विद्यालयाच्या निकालावर दिसून येत नाही. यात विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम व शिक्षकांच्या मोलाचे मार्गदर्शन यामुळे या बोर्ड परिक्षेत गुणवत्ता टिकून आहे, असे गौरवोद्गार संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षि विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी काढले. दरम्यान, विद्यालयाच्या निकालाबाबत प्राचार्य राजेंद्र पानसरे म्हणाले, विद्यालयाची ही १२ वी बॅच आहे. यामध्ये १९ विद्यार्थ्यांना ९० च्या पुढे गुण मिळाले आहेत. 

या विद्यार्थ्यांना शिक्षक जयप्रकाश पांडेय, मेघराज काकडे, विजय कोल्हे, बाळासाहेब बढे, स्वप्निल पाटील, शिवप्रसाद घोडके यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे. के. दरेकर, सर्व विश्वस्त व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले.