Breaking News

प्रवरा पब्लिक स्कुलचा १०० टक्के निकाल


प्रवरानगर प्रतिनिधी

प्रवरा पब्लिक स्कूलचा बारावी परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेतील सुनीत सयराम शेळके या विद्यार्थ्याला ९३. २३ टक्के गुण मिळाले असून तो शाळेत पहिला आला. भौतिकशास्त्र विषयात त्याला १०० पैकी १०० गुण मिळाले तर सात्विक विनोद पांडे या विद्यार्थ्यालासुद्धा ९३. २३ टक्के गुण मिळाले. जोसेफ जोसलीन मारियल हिला ९०. ६३ टक्के गुण मिळवून ती तिसरी आली. जेईई परीक्षेमध्ये तिला १५७ गुण मिळाले, अशी माहिती प्राचार्य सयराम शेळके यांनी दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर आदींनी अभिनंदन केले.