वाळवणे, भोयरे गांगर्डा शाळेत योग दिन उत्साहात
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांनी योगासने करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भोयरे गांगर्डा शाळेतील मुख्याध्यापिक मंदा साबळे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाबाबत माहिती दिली. विद्यालयातील शिक्षिकांनी ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान आदी योगासनाचे प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला. यावेळी विद्यालयातील शिक्षकांसह, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाळवणे येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका व्होरा यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी योगासने, प्राणायम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.