13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 23 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट
सातारा, दि. 21, जून - सातारा जिल्ह्यासाठी 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 23 लाख रोपेलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड 1 ते 31 जुलै या दरम्यान करावयाची आहे.वृक्षलागवडीमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणत सहभाग घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीआज केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषदत सभागृहात आज 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गतविभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या.
महाराष्ट्र हरित सेना हा उपक्रम वन विभागाने सुरु केला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील 75 हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या हरित सेनेमध्ये आणखी नोंदणी कशी वाढले यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकर घ्यावा. कृषी विभागाने शेतकर्यांच्या बांधावर 1 ते 31 जुलै या दरम्यान फळबाग लागवडीचे नियोजन करावे.
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झालेल्या गावांमध्ये वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घ्यावा. तसेच 1 ते 31 जुलै या दरम्यान वृक्ष लागवड क रावयाची आहे यासाठी प्रत्येक विभागाने लागवडीचे नियोजन करावे. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये गावातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे. रोपे कशा पद्धतीने लावगड केली पाहिजे याची मा हिती वन विभागाने प्रत्येक विभागाला द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला वृक्षांची लागवड करावयाची आहे. या वृक्षांच्या संवर्धनासाठी उपाय योजना कराव्यात.
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सीसीटीची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांवर शाळेंच्या सहलींचे नियोजन करुन सीसीटीमध्ये विद्यार्थ्यांकडून बियाणे टाकून घ्यावीत. तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबतची यावेळी माहिती द्यावी, अशा सूचनाही सिंघल यांनी शेवटी केल्या.