कुळधरणला चिमुकल्यांचा उत्साह
कुळधरण येथील छत्रपती पब्लिक स्कूलच्या प्रांगणात योगदिनानिमित्त योगासने आणि कवायती घेण्यात आल्या. चिमुकल्या बालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. प्राचार्य श्रावण गिरी यांनी योगदिन साजरा करण्यामागील भूमिका सांगत दिनाचे महत्त्व विशद केले. विश्वा शिंदे यांनी विविध प्रात्यक्षिके करुन दाखविली. सचिन बाराते यांनी क्रीडा संचलन केले तर अनुमोआ पवार यांनी आभार मानले. के.आर.घालमे, रमेश पवार, रमाकांत गजरमल, सुनिता कापसे, प्रेमलता शिंदे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.