कागदपत्रांची मागणी होऊ लागल्याने काही दलाल भूमीगत शेतकऱ्यांची लूट होत असताना ग्रामिण पोलीस सुस्त
गोड बोलून शेतकऱ्यांना जुने ट्रॅक्टर घ्यायला भाग पाडून लूटमार करणाऱ्या दलालांकडे कागदपत्रांची मागणी होऊ लागताच काही दलाल भूमिगत झाले आहेत. शेतकर्यांच्या कष्टाच्या पैशावर अय्याशी करणारे काही धेंड दलाल कागदपत्रांची मागणी करताच मी आता दारू पित असून आपण उद्या बोलू असे सांगत बोलणेच टाळू लागले आहेत. काका मामा दाजी नाना असे नातेगोत असलेला येवले तालुक्यातील एक दलालाने जवळच्या नातेवाईकाची 30 ते 50 हजार रुपयांची फसवणूक केली असून या फसवणुकीतून त्याने काही लाखाची माया जमा केली आहे. बनावट नोटा छापण्याच्या टोळीतून बाहेर पडलेल्या व एका महाराज बाबाला बकरा बनवलेल्या खलनायक एका दलालांची रंगीत कहाणी सविस्तर हकिगत वाचूच. शेतकऱ्यांना जुने ट्रक्टर विकून दोन वर्षे लोटली तरी कागदपत्रे न देणाऱ्या दलाला मागे शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर काही दलाल भूमिगत झाल्यासारखे दिसेनासे झाले असून काहींनी लोकमंथन चा धसका घेतला आहे. कष्ट न करता गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशातील रक्कम लुटणाऱ्या ट्रॕक्टर दलालांच्या कारभारावर या पूर्वी प्रकाशझोत टाकला असून त्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत. या लुटमारीची माहिती काही प्रमाणात पोलिसांना असली तरी नेहमी प्रमाणे गुन्हा दाखल होईपर्यंत यंञणा सुस्त झाल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या पैशावर मौज करणाऱ्या दलालांनी टॕक्टरच्या सौदेबाजीतून दारू अड्डे तेजीत आणण्याचे पुण्यकर्म सुरू केली असल्याचा उपहास सुरू आहे.