Breaking News

संस्था चालकांच्या वेठबिगारीला ञस्त मतदारांमुळे नवखा उमेदवाराला सहानुभूती


नाशिक शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेच्या निवडणूकीत प्रतिस्पर्ध्यावर मात करून विधीमंडळात शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेक दिग्गजांसह काही हवशे गवशे नवशेही गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकीच्या मांडवाखाली ऊभे आहेत.मतदार माञ मतदानाच्या अक्षता फेकताना अतिशय जागरूकता बाळगणार असल्याचे गेल्या आठ दिवसातील घडामोडींवरून दिसू लागले आहे.
उद्या सोमवार दि.२५ जुन रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदान संपन्न होत आहे.यावेळी ५२ ते ५३ हजार उच्च शिक्षित शिक्षक मतदानास पाञ आहेत.या मतदानावर हक्क सांगण्यासाठी तब्बल एकोणावीस उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख राजकीय पक्षाचा चेहरा असलेले केवळ चार उमेदवार लढतीत असल्याची चर्चा आहे.
या चार प्रमुख उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित असलेला मतदार सुज्ञपणे विचार करून तुलना करू लागल्याने शिक्षण संस्थानिक असलेल्या उमेदवारांच्या पाया खालची वाळू सरकू लागली आहे.
पदवीधर ,स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात होणारी निवडणूक आणि शिक्षक मतदार संघात होणारी निवडणूक यात मुलभूत फरक आहे.पहिल्या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढविणार्या उमेदवारांचा त्या मतदारसंघातील मतदारांशी असलेला संपर्क आणि उमेदवारांनी नव्याने विकसीत केलेले मते मिळवण्याच्या तंञाला किती अर्थ प्राप्त होतो यावर या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे निवडणूक निकालांनी सिध्द केले आहे.
शिक्षक मतदार संघात हे दोन्ही मुद्दे महत्वाचे ठरत असले तरी शिक्षकांचा हक्काचा असलेल्या या मतदार संघात शिक्षण सम्राटांनी घुसखोरी केल्याने मतदार असलेल्या शिक्षकांशी संस्थाचालकांचे वर्तन हा मुद्दा खर्या अर्थाने निर्णायक ठरू पहात आहे.
यंदाच्या निवडणूकीत नाशिक विभागात लढतीत असलेल्या चार प्रमुख उमेदवारांपैकी दोन उमेदवार संस्थाचालक म्हणून ओळखले जातात तर एका उमेदवाराने आयुष्यभर सत्तापदे भोगूनही पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून बंडखोरी केली तर चौथा उमेदवार राजकीय दृष्ट्या नवखा असल्याने कोरी पाटी म्हणून शिक्षक मतदारांचे आकर्षण ठरला आहे.
शेवटच्या क्षणापर्यंता राजकारणात वेगवेगळे "प्रताप"दाखविण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे दमछानक होईपर्यंत मतदारांना भुलवीत आहेत,तर दुसर्राया बाजूला दोन शिक्षण सम्राट आपल्काया शिक्षण संस्थेतील शिक्षकानाही न्याय देतांना कंजूषी दाखवित आहेत,शिक्षकांना संस्थेतील वेठबिगार समजून राबविणारे शिक्षकांप्रती कुठला आदर सभागृहात दाखवणार असा प्रश्न मतदारांना भेडसावत असून त्यावर विभागात विचारमंथन सुरू आहे.यात काही उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचीही चर्चा मतदारांवर नकारात्मक परिणाम करू पहात आहे.या पार्श्वभुमीवर चौथा उमेदवार राजकारण आणि निवडणूक क्षेञात नवखा असला तरी प्रशासकीय अनुभवाचा फायदा शिक्षकांचे प्रश्न सोडवितांना होऊ शकतो,ही त्याची जमेची बाजू पथ्यावर पडत आहे.
एकूणच या निवडणूकीत प्रस्थापित विरूध्द नवखा अशी लढाई दिसत असून प्रस्थापितांना धडा शिकवण्याची मानसिकता धक्का देणारा निकाल लावण्यास कारणीभूत ठरू शकते असा जाणकारांचा होरा आहे