Breaking News

रमजान ईद बंधूप्रेमाचा संदेश देणारा सण : आ. थोरात


संगमनेरात ईद उत्साहात साजरी

संगमनेर प्रतिनिधी

भारतीय परंपरा ही विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक सण हे एकात्मतेचा व नवआनंद देणारे असतात. पवित्र रमजानच्या उपवसानंतर येणारा रमजान ईद हा सण विश्‍वाला एकात्मता बंधूता व प्रेमाचा संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

इदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, गजेंद्र अभंंग, गणेश मादास, गुलाबराव ढोले, किशोर कालडा, किशोर टोकसे, किशोर पवार, कन्हैय्या कागडे, शकील पेंटर, लक्ष्मण बर्गे, उमेश बोरकर, शफी तांबोळी, लाला दायमा, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, डॉ. सचिन बांगर, पी. आय. सुनिल पाटील, केशवराव मुर्तडक आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील व तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.