Breaking News

घर कामगार महिलांसाठी १९ ला लढा


राहुरी प्रतिनिधी

आजच्या {दि. १६ } आतंरराष्ट्रीय घरकामगारदिनानिमित्त राष्ट्रीय घरकामगार चळवळ हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्यावतीने मंगळवारी {दि. १९} हक्कासाठी लढ्याचा निर्धार करण्यात आला आहे. निवृत्ती वेतन मिळावे, किमान वेतन मिळावे, घरकामगारांची नोंदणी व्हावी, कामगार कल्याण कायद्यामधे दुरुस्ती करुन घरेलू कामगार मडंल त्यात समाविष्ट करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय घरकामगार चळवळ अहमदनगर जिल्हा सघंटक संदीप कोकाटे, प्रमुख घरकामगार महिला सुवर्णा जगधने, भारती ससाणे, छबुबाई जगधने, शैला बोरुडे, सुनिता जगधने, शकुतंला काते आदी यावेळी उपस्थित होत्या.