Breaking News

अंबडमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी मित्रास अटक


जालना, दि.30 :
 अंबड येथील व्यापार्याचा मुलगा गोविंद गगराणी याची हत्या त्याच्या तीन मित्रांनीच केली असून अंबड पोलिसांनी मुख्य आरोपी अरूण जाधव (29) यास 24 तासाच्या आत पकडले आहे.आणखी दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत .काल जालना जिल्ह्यातील अंबड शहरात जवळ एका अवघ्या 19 वर्षीय मुलाचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.नंतर या मुलाचे नाव गोविंद गगराणी असल्याचे समोर आले होते.तो जालन्यातील एका घाऊक किराणा व्यापार्याचा एकुलता एक मुलगा होता.त्याचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत सापडला होता,हा मुलगा रविवारी रात्रीपासूनच बेपत्ता होता.अंबड पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तपास केला असून त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे त्या पैकी अरूण जाधव यास अटक करण्यात आली आहे.