Breaking News

योग जीवनास संयम, शिस्त लावणारे शास्त्र


पारनेर तालुक्यातील हंगा येथिल न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना विद्यालयाचे योग शिक्षक अमोल यादव यांनी सांगितले की, योग हे जीवनाला संयम आणि शिस्त लावणारे शास्त्र आहे. तसेच विविध रोगांनी ग्रासलेल्या मानवाला करा योग रहा निरोग चा मंत्र देखिल त्यांनी यावेळी दिला. यादव यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना योगाचे जीवनातील महत्व, उपयुक्तता तसेच योगासने व प्रणायमाचे विविध प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास लोकनेते निलेश लंके, शाळा समिती सदस्य युवराज दळवी, अ‍ॅड. जगदीप शिंदे, बबन साठे आदींसह पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
योगदिन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक काशिनाथ भोये, संदीप शिंदे, अरूण लोंढे, कुंडलिक दरेकर आदिंनी परिश्रम घेतले. योगदिनाचे प्रास्ताविक संदीप शिंदे यांनी तर, आभार सोनवणे यांनी मानले.