Breaking News

अखेर वादग्रस्त कवठे-केंजळ योजनेचे पाणी किकली, बेलमाची शिवारात डिसेंबरमध्ये पोहोचणार


सातारा - गेली वीस ते पंचवीस वर्षे वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर मतदार संघात कवठे-केंजळ योजनेचे पाणी या ना त्या कारणाने वेळोवेळी गाजले. गावच्या ग्रामसभेपासून मंत्रालयापर्यंत अनेकवेळा वाजले. तरीसुध्दा या योजनेमध्ये देगाव, शिरगाव, किकली, बेलमाचीसह या गावांचा सहभाग होण्यासाठी आग्रही असणारे माजी खासदार गजानन बाबर यांनी अलिकडे या योजनेसाठी भलतीच धावपळ करत सुरू असणारे काम निकृष्ट दर्जाचे आहे. पाईप जमिनीच्या वर असल्याने शेतक-यांना त्याचा त्रास होणार आहे. परिणामी शेतक-याचे व शासनाचे नुकसान टाळण्यासाठी या प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, वाईचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, सहायक अभियंता मनोज गुजर यांच्यासमवेत किकली येथे लाभार्थी गावातील शेतक- यांची सहविचार सभा घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. 
माजी खासदार गजानन बाबर म्हणाले की, कवठे-केंजळ या योजनेचे पाणी किकली, बेलमाची या शिवारात येण्यासाठी योजना कागदावर येत असतानाच मी स्वतः तत्कालिन अधिका-यांच्या बरोबर शिवारातून सर्व्हे केलेला आहे. योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यातही माझा वाटा आहे. मी श्रेयवाद घेणारा माणूस नाही परंतु आमच्या शिवारात येणारे व आमच्या नशिबाने मिळणारे पाणी दर्जेदार व गुणवत्ताधारक पाईपमधून मिळावे. वारंवार त्याठिकाणी गळती किंवा पाईप फुटणे असे प्रकार होण्यापूर्वी दक्षता घ्यावी यासाठी परीसरातील सर्व शेतक-यांना एकत्रित करून प्रक ल्पअधिक्षक यांच्याशी हा संवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शेतकरी व अधिकारी यांनी योग्य तो समन्वय राखून योजना पूर्णत्वास न्यावी, गरज पडेल तेथे मी स्वतः उभा आहे.