Breaking News

मेडिकला आग; 9 जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 30 -  शहरातील अंधेरी पश्‍चिम येथील एका मेडिकल दुकानाला गुरूवारी सकाळी 6 वाजता लागलेल्या भीषण आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला.  तर, एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार अंधेरी पश्‍चिम परिसरात जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीत असलेल्या वफा या मेडिकलच्या दुकानाला आज अचानक आग लागली. यावेळी  मेडिकलच्यावर दोन मजल्यांवर राहत असलेल्या खान कुटुंबातील नऊ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, तीन महिला, दोन मुली व तीन  मुलींचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.  आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.