Breaking News

लष्कर ए तोयबाचा कमांडर जुनैद मट्टू याचा मृतदेह सापडला

नवी दिल्ली, दि. 18 - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील अरवानी गावात ठार झालेला लष्कर ए तोयबाचा कमांडर जुनैद मट्टू आणि त्याचा साथीदार नसीर वानी  याचा मृतदेह सापडला असल्याचे वृत्त आहे. आणखी एका दहशतवाद्याचा मृतहेद सापडला आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत झाली. यावेळी लष्कर ए तोयबाचा कमांडर जुनैद मट्टू याच्यासहित दोन दहशतवादी ठार झाले  होते.
जुनैद मट्टू याला पकडण्यासाठी लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच जवानांनी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना घेरले होते.  दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिल होते. यावेळी जुनैद गट्टू आणि त्याच्या एका साथीदाराला कंठस्नान घालण्यात आले.