Breaking News

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची दुसरी तुकडी रवाना

श्रीनगर, दि. 30 - जम्मू येथून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना झाली.2 हजार 481 भाविकांसाठी 66 गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या  तुकडीत 1638 पुरुष, 663 महिला आणि 180 साधूंचा समावेश आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
काल सकाळी पहलगाम आणि बालटाल या मार्गावरुन यात्रेस सुरुवात झाली. 6097 भाविकांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी 3,880 मीटर उंचीवर असलेल्या बाबा  बर्फानीचे दर्शन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या यात्रेत आठ दिवस कमी असणार असल्याचे एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले. तसेच काल (29 जून) 6  हजारपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले.