Breaking News

मुप्टा महाराष्ट्र शिक्षक संघटनेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा


ठाणे - कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे यांना मुप्टा महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला आहे. कोकणातील शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल संघटनेने डावखरेंना पाठिंबा दिला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अ‍ॅड. निरंजन डावखरे यांची संघटनेच्या प्रतिनिधींनी ठाण्यात भेट घेतली. त्यावेळी संघटनेने पाठिंब्याचे पत्र दिले. या वेळी भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते.
गेल्या सहा वर्षांत कोकण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न व मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्यामुळे शिक्षकांच्या वेतनासाठी ऑनलाईन पद्धत, भविष्य निर्वाह निधी, सर्व्हीस बूकचे रेकॉर्ड ऑनलाईन, शालार्थ प्रणाली बंद पडल्यानंतर ऑफलाईन वेतन आदी निर्णय राज्य सरकारने घेतले. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला. कोकणातील अनुदानित-विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अ‍ॅड. निरंजन डावखरे यांची पुन्हा निवड ही काळाची गरज आहे. निरंजन डावखरे यांच्यामागे संघटनेची पूर्ण ताकद उभी राहिल, असे संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे, उपाध्यक्ष मिलिंद पाखरे, पदाधिकारी वसंत पानसरे, कमलेश राजपूत यांनी पत्रकात म्हटले आहे.