Breaking News

वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

कुळधरण प्रतिनिधी  
स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमीत्त कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील मुलांच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी केक कापुन वाढदिवस साजरा केला. कर्जत तालुका स्वाभिमान संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तालुकाध्यक्ष विकास गोडसे, महेश निंबाळकर, राहुल परकाळे, ओंकार बळे, अक्षय होलम आदी उपस्थित होते.