Breaking News

नाशिक येथे हाणामारी झाल्याने मतदानास गालबोट

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी 25 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरु झाले.परंतु, नाशिक येथे हाणामारी झाल्याने मतदानास गालबोट लागले नाशिक येथे शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणूकीतून माघार घेतली असल्याचा संदेश सोशल मीडियावर पसरला. हा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने पसरवला असल्याच्या संशयाने वातावरण चिघळले.भालेकर विद्यालयातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादंग होवून हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.बेडसे आणि दराडे यांच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले