पुणे : पुण्यात पतंगाच्या मांजामुळे गळा कापल्याने जखमी झालेल्या माहिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुवर्णा मुजुमदार असे या महिलेचे नाव असून रविवारी सकाळी खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. पतंगासाठी चिनी मांजावर बंदी असतांना देखील मांजा महिलेच्या जीवावर आल्याची घटणा पुण्यात घडली आहे. सुवर्णा शिवाजी पुलावरून दुचाकीवर घरी जात होती. यादरम्यान त्यांच्या गळया भोवती मांजा अडकल्याने त्यांचा गळा कापल्याने महिला गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी सकाळी उपचारादरम्यान सुवर्णाचा मृत्यू झाला आहे.
पतंगाच्या मांजामुळे गळा कापून महिलेचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:12
Rating: 5