Breaking News

तालुका समन्वयकपदी प्रविण चोरडिया


पाणी फौंडेशनच्या स्पर्धेत विशेष काम करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या जामखेड तालुका समन्वयकपदी येथील व्यापारी प्रवीण चोरडिया यांची निवड भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष अमर गांधी यांनी केली. यावेळी विभागीय अध्यक्ष आदेश चंगेडिया, जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, जिल्हा सचिव प्रीतम शहा, प्रसाद शहा, श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, कांतीलाल भळगट, दिलीप गुगळे, पिटु बोरा, अमोल ताथेड, आनंद गुगळे, संतोष फिरोदिया, जितेंद्र बोरा, गणेश भळगट, तेजस कोठारी, संतोष फिरोदिया, संजय कटारिया, अभय बोरा, रशिक बोथरा, मनोज भंडारी, सुमित चानोदिया, प्रफुल्ल सोळंकी, सचिन भंडारी, रविंद्र गादिया उपस्थित होते.
जामखेड तालुक्यातील चाळीस गावांची निवड करण्यात आलेली असून पानी फौंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठी काम सुरू केले आहे. पाणी फौंडेशनला साथ मिळावी म्हणून भारतीय जैन संघटनेच्या वतीने मदत केली जाणार आहे. याची सुरुवात प्रथम तालुक्यातील चाळीस गावातील सरपंच व ग्रामस्थ यांना दोन टप्प्यात प्रशिक्षणासाठी जिल्हातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाठविण्यात आले होते.