Breaking News

विजय माल्ल्याच्या संपत्तीवर टाच ईडीकडून मल्ल्याच्या संपत्तीची जप्ती सुरुवात

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मंगळवारपासून लिकर किंग विजय माल्याची संपत्ती जप्त करायला सुरुवात केली जाणार आहे. कलम 83 नुसार ही कारवाई केली जाणार आहे.फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यासंदर्भातील कलम 83 नुसार फरार झालेल्या गुन्हेगारीची संपत्ती जप्त केली जाते. तत्पूर्वी समन्सची दखल न घेतल्याने दिल्ली न्यायालयाने माल्लाला गुन्हेगार घोषित केले होते. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, माल्याने 1996, 1997 आणि 1998 मध्ये ब्रिटीश कंपनीला आणि काही देशांना फॉर्म्यूला वन वर्ल्ड चॅम्पियनशीमध्ये किंगफिशरचा लोगो दाखवण्यासाठी 2 लाख डॉलर दिल्याचा आरोप केला आहे. तपास संस्थेने म्हटले आहे, की मल्याने हे पैसे देताना रिझर्व बँक ऑफ इंडीयाची परवानगी घेतलेली नाही. तथापी त्याने एपईआरएच्या नियमांचेही उल्लंघण केले आहे.