सर्वसाधारण विजेतेपदामुळे सातारा बॉक्सिंग संघाने रचला नवा इतिहास
सातारा, दि. 21, जून - राज्य बॉक्सिंग संघटनेमार्ङ्गत लोणी- काळभोर (पुणे) येथील एमआयटी एडीटी युनिर्व्हसिटी येथे घेण्यात आलेल्या 5 व्या राज्य अजिंक्यपद सब ज्युनियर (मुले) बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. अकॅडमीच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्ह्याला प्रथमच सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळाला. सातारा बॉक्सिंग आणि राज्य बॉक्सिंगच्या इतिहासात सातारा बॉक्सिंग अकॅडमीमुळे नवा इतिहास रचला गेला.
दि. 14 ते 17 जून या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या संघाकडून खेळताना बॉक्सिंग अकॅमडीच्या कुणाल माने (44-46 किलो), आयुष मोकाशी (52-54 किलो) आणि अ भिवर्धन शर्मा (63-66 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. आदित्य जाधव (36-38 किलो), पार्थ ढोणे (40-42 किलो) आणि ओमकुमार ङ्गरांदे (54-57 किलो) यांनी रौप्यपदक तर, सुमित घाडगे (48-50 किलो) आणि वेदांत कोकीळ (50-52 किलो) या दोघांनी कांस्प पदक पटकावले. एकूण 8 पदकांमुळे सातारा बॉक्सिंग अकॅडमीने सातारा जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळवून दिले आणि एक नवीन इतिहास घडला.
सर्व खेळाडूंना सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक गोपाल राठोड, विनोद दाभाडे, विनोद राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. आयुष मोकाशी याला आंतरराष्ट्रीय बॉक्सर आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू मनोज पिंगळे यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार वाव्हळ, उपाध्यक्ष बाळासाहेब आगवणे यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल अकॅडमीचे पदाधिकारी हरिष शेट्टी, दौलत भोसले, रविंद्र होले, असिस्टंट कमांडंट डॉ. प्रशांत जगताप, भूषण आडके, पत्रकार अमर मोकाशी, नगरसेवक मिलिंद काकडे, विजय मोहिते, संजय पवार, डॉ. राहूल चव्हाण, असिङ्ग मुलाणी, प्रकाश साळवी,गजानन ङ्गरांदे, अभिजित ढोणे, संजय जाधव यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील आणि महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.