योगासने, प्राणायाम, सुर्यनमस्कारासह कवायतींनी कर्जत तालुक्यात योगदिन
कर्जत तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समवेत प्राणायाम, सुर्यनमस्कार, कवायती तसेच योगासने केली.शासन आदेशानुसार देण्यात आलेल्या सकाळी सात ते आठ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येवून, दुपारी 12 वाजता शाळा सोडून देण्यात आल्या.
खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा झाला. क्रीडा शिक्षक आण्णासाहेब मोरे, तात्याराम गावडे यांनी योगासने तसेच प्राणायामाचे महत्व पटवून देत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे संचलन घेतले. पिंपळवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. श्रीम. घुले व भरत तांबे यांनी विद्यार्थ्यांची योगासने घेतली. राशीनच्या मुले व मुलींच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योगदिन साजरा झाला. इंग्रजीतील योगा शब्दाचा आकार तयार करुन विद्यार्थ्यांनी योगासने केली. आदिवासी पारधी समाज विकास संस्थेच्या संकल्प वसतिगृहातील विद्यार्थ्यांनीही जागतिक योग दिन साजरा केला. विजय भोसले व प्रणिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिंपोरा येथील श्री श्रीरंग बापू मोरे विद्यालयात मुख्याध्यापक बापूराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा झाला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी योगासने केली. दगडी बारडगावच्या स्व. पी.टी. शर्मा विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र साके यांनी योगदिनाचे आयोजन केले. चांदे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही योगदिन उत्साहात साजरा झाला.शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी योगासने केली.
कुळधरण येथील गुंड वारे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नितीन घालमे व स्मिता गडगडे यांनी योगदिनाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांच्या कवायती व सुर्य नमस्कार घेण्यात आला. कर्जतच्या सद्गुरु कन्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनींनी योगदिनानिमित्त आयोजित उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.प्राचार्या ज्योती अवसरे यांनी विद्यार्थीनींना योगदिनाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले. विद्यार्थीनींनी सुर्यनमस्कार, प्राणायाम व योगासने केली. यावेळी श्रध्दा मोरे, प्रियंका वाघमारे, अनिल यादव, सोमनाथ कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते.