Breaking News

तणाव निर्माण करणारी ‘पोस्ट’ टाकणारा गजाआड


राहुरी विशेष प्रतिनिधी

सोशल मिडियावर मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखविल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील गुहा गावात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. काही काळ गावकरयांनी गाव बंद ठेवत या प्रकाराचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा येथील मछिंद्र एकनाथ शिंदे या तरुणाने हा प्रकार केल्याने त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. 

गेली चार महिन्यांपूर्वी गुहा गावात झेंडा लावण्याच्या कारणावरुन तुफान हाणामाऱ्या झाल्या होत्या. राहुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर दि.१५ रोजी सकाळी गुहा येथील मछिंद्र शिंदे या तरुणाने सोशल मिडियावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखवतील व समाज्यात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकली. त्यामुळे या भागातील मुस्लिम समाजाच्या संतप्त नागरिकांनी काही वेळ गाव बंदची हाक दिली.

यावेळी मुस्लिम समाजाच्या तरुणांनी गावात आणि पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली होती. पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ पोलिस फौजफाटा घेत गुहा येथे धाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती घेत मुस्लिम समाजाला त्यांनी शांततेचे आवाहन केले. श्रीरामपूर पोलिस विभागाचे पोलिस उपधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थ आणि नागरिकांची बैठक घेतली. समाजाच्या भावना दुखवणारया तरुणास तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.