Breaking News

शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थीनीची आत्महत्या

शहरातील विठ्ठल मंदिराजवळ राहणार्‍या रेणूका राम काकडे वय 16 या विद्यार्थीनीने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी धाव घेतली व शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. यूवराज खराडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 


मयत रेणूका काकडे हीने नववीपर्यंतचे शिक्षण मामाकडे घेतले. पुढील शिक्षणासाठी ती आपल्या आई वडीलांकडे जामखेडला आली होती. दि. 15 जून रोजी शहरातील नागेश विद्यालयात दहावीच्या प्रवेशाची चौकशी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दूपारी घरी आल्यावर 3 वाजे दरम्यान घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत घरात आढळून आली.
सदर काकडे कूटूंब हे सर्वसामान्य असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. तिच्यामागे आईवडील, एक बहिण आहे. आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटना घडलेल्या घराला कूलूप लावले आहे. पूढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ. बापुसाहेब गव्हाणे करत आहेत.