Breaking News

भेंडा फॅक्टरी जि.प शाळेत नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी जि.प. प्राथमिक शाळेत पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे जि.प. सदस्य दत्तात्रय काळे, पं.स सदस्य अजित मुरकुटे, व शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

भेंडा फॅक्टरी जि.प. शाळेत बारा पैकी सात नविन शिक्षक बदलुन आले आहेत. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भेंडा सोसायटीचे माजी चेअरमन रमेश गोर्डे, जलमित्र सुखदेव फुलारी, अ‍ॅड रविंद्र गव्हाणे, मुख्याध्यापक, वृषाली कुलकर्णी, शिक्षक कल्याण नेहुल, पावलस गोर्डे, बाळासाहेब डाके, मोहन वाबळे, संजय थोरात, सतिष चाबुकस्वार, सुनंदा विधाटे, संजिवणी मुरकुटे आदी उपस्थित होते.