Breaking News

शिंगणापूर रस्ता पुन्हा रखडला!


अहमदनगर प्रतिनिधी :- घोडेगावहून शिंगणापूरकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याचे काम पुन्हा रखडले आहे. ठेकेदाराने या रस्त्यावर केवळ खडी आणि मुरूम टाकून तो रोडरोलरने व्यवस्थित दाबून घेण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे. परिणामी या रस्त्याच्या कडेला असलेली शेती आणि घरे नेहमी धुळीने माखलेले असतात. त्यामुळे या भागातील लोकांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे.