Breaking News

’नवा गणवेश व दप्तरासह ’करण’ ची शैक्षणिक वाटचाल सुरु ! जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनचा उपक्रम

आई मुकबधीर तर, वडीलांचे कायमचे आजारपण त्यातच घरी अठराविश्‍वे दारीद्रय त्यामुळे, या सर्वांमधून मार्ग काढून, खूप शिकायचे व मोठे व्हायचे असे स्वप्न डोळ्यात पाहुन, यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची मनाची तयारी करुन नव्या शैक्षणिक वर्षात इ. 9 वीमध्ये शिक्षणासाठी लागणार्‍या शिक्षणाच्या साहित्यासाठी, येथील कोठारी सामाजिक प्रतिष्ठानने पुढाकाऱ घेत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी करण च्या कुटुंबियांची भेट घेवून, त्याची दोन वर्षाची संपुर्ण शैक्षणिक जबाबदारीही घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कोठारी यांनी जामखेड येथे करणला गणवेष व शाळेचे साहित्य देवून मदत केली. आता नवा गणवेष व नव्या स्वप्नांसह त्याची शैक्षणिक वाटचाल सुरु झाली आहे.

’करण चव्हाण’ हा जामखेड येथील एका शाळेत इ. 9 वी शिकणारा विद्यार्थी एक महिण्यापुर्वी पाटोदा शहरात आठवडी बाजारच्या दिवशी प्रत्येक दुकानांमध्ये जावुन मला शिक्षण घेण्यासाठी वह्या पुस्तके व साहित्य घेण्यासाठी 1 रु., 2. रु मदत करा अशी विनवणी करीत होता, येथील सजग व्यापारी रामचंद्र जायभाय यांच्या दुकानात तो गेल्यानंतर त्यानी ही माहिती एका पत्रकारास दिल्यानंतर करणशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, त्याने आपली हृदयद्रावक कहाणी सांगितली. याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच करणच्या मदती साठी जामखेड येथील जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असलेल्या संजय कोठारी यांनी पुढाकार घेत, त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून करणची दोन वर्षसाठीची संपुर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. आता सर्व आवश्यक ते शैक्षणिक व दोन गणवेश त्याला दिले आहेत. याप्रसंगी मिठूलाल नवलखा, शांतीलाल बोरा, सचिन गाडे उपस्थित होते.