राष्ट्रवादीच्या आठ जणांना जामीन मंजूर
अहमदनगर/प्रतिनिधी।
केडगावच्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी आणखी आठ जण शनिवारी भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले त्यांना दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता. त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यामध्ये जॉय लोखंडे, गजानन भांडवलकर, सुभाष पवार, रमेश विलास शिंदे, अवधूत अशोेक कासार, मनिष मदनलाल फुलडहाळे, मंगेश दिलीप खताळ, चेतन चव्हाण हे आठ जण सकाळी भिंगार पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर या सर्वांना 25 हजाराच्या वैयक्तीक जाचमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
केडगाव येथे दुहेरी हत्याकांडानंतर चौकशीसाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात आमदार संग्राम जगताप यांना बोलविण्यात आले होते. आ.जगताप यांची चौकशी सुरु असताना त्यांच्या समर्थकांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करुन आ.जगताप यांना सोडवून नेले होते. याप्रकरणातील आतापर्यंत 87 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते हे तिघे पोलिसांत हजर झाले होते. त्यांचाही दोन दिवसापूर्वी जामीन झाला आहे.
