जिल्हाध्यक्षपदी यशवंत सालके यांची निवड
अहमदनगर/प्रतिनिधी।
अहमदनगर जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी यशवंत सालके, कार्याध्यक्षपदी पार्श्वनाथ औटी, सचिवपदी सुदाम बोंदर्डे, खजिनदारपदी संजय कडूस व सहसचिवपदी यशोदा कराड यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राधेश्याम सपकाळे, ए.वाय.नरोटे, चंद्रशेखर वाढेंकर,बन्सी आगळे, विजय कुलकर्णी, सूर्यकांत क्यातम, संजय आगलावे, राजेंद्र म्हस्के, शंकरराव पंतगे, दिपक घोडेराव, राघवेंद्र चव्हाण, राजू डोंगरे, बागूल, विलास वाघ, सुनिल सुपेकर, चन्ने, मंडलिक, पठारे, सोनाली लेंडकर, वैशाली राजगुरु, सुर्वणा गावडे, सुषाभ कासार आदी उपस्थित होते.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राधेश्याम सपकाळे म्हणाले की, राज्य संघटनेच्या माध्यमातून लेखा कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. मार्चमध्ये केलेल्या संपातून अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले. सरकारने त्यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.