वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात
अहमदनगर, दि. 21 - वीज तांत्रिक कामगार संस्थेच्या योग्य धोरणामुळे कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. संचालक मंडळाने घेतलेल्या कामगार हिताच्या निर्णयाने कामगारांना खर्या अर्थाने आर्थिक संरक्षण मिळाले आहे. वार्षिक अहवालाकडे पाहून संस्थेची प्रगतीकडे वाटचाल चालू असल्याचे दिसते. शहरीकरण वाढत असताना, नागरिकांना अविरत वीज पुरविण्यासाठी वीज तांत्रिक कामगार मेहनत घेत असतात. नुकतेच संघटनेने न्याय मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले असून, कामगार संघटनचा हा विजय असल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा तुषार गार्डन येथे शांततेत पार पडली. यावेळी आ.जगताप बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब वामन तर याप्रसंगी अजय चितळे, बाबासाहेब वाकडे, अशोकराव पाथरकर, भाऊसाहेब भाकरे, आर.पी.थोरात, ताराचंद कोल्हे, अशोकराव वामन, विलास बारवकर, सुनील पेन्टा, लेखा परिक्षक इंगळे, अनिल शिरसाठ, वीजयकुमार ठाणगे, माऊली बडदे, श्रीरामपुर शाखेचे चेअरमन साहेबराव क्षीरसागर, सचिव मछिंद्र भारती, शेवगांव शाखेचे सचिव प्रवीण जठार, सदिच्छा मंडळाचे पदाधिकारी बाळासाहेब पवार, सतीष लोहगावकर, शंकर जारकड, सचिन चोरग, संतोष भिंगारदिवे, आशीष वेळापुरे, तज्ञ संचालक भास्करराव तरटे, संस्थेचे व्हा.चेअरमन बाळासाहेब साळुंके, सचिव दत्तात्रय वडतिले आदिंसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभेत उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद व गुणवंत कामगारांचा सत्कार करण्यात आला. मागील आर्थिक वर्षात संस्थेच्या संचालक मंडळाने उत्कृष्ट पारदर्शी कारभार पाहिल्याबद्दल सभासदांच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा सामुहिक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात संस्थेचे संचालक दत्तात्रय थोरात यांनी कामगार हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. बैठकिचे सुत्रसंचलन संतोष सोलाट यांनी केले. बैठक यशस्वी होण्यासाठी कार्यकारी संचालक सतीष भुजबळ, शंकर जारकड, प्रवीण जठार, अरुण भोसले, संतोष शेलार, दिपक हुशारे यांनी परिश्रम घेतले.