पाक क्रिकेट बोर्डाची उमर अकमलला नोटीस
पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलने मागे २०१५ च्या विश्वचषकात बुकींकडून आपल्याला दोन लाख अमेरिकन डॉलरची ऑफर देण्यात आली होती असे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. पाकिस्तानमधील सामा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत असताना उमर अकमलने हा दावा केला होता. त्याचं हेच वक्तव्य आता त्याच्या अंगलट येणार असल्याचं दिसतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलला मॅच फिक्सींगच्या वक्तव्यावरुन नोटीस पाठवल्याचं समजतं आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने उमर अकमलला २७ जूनरोजी आपल्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.