Breaking News

सोनई येथे शाहू महाराजांना अभिवादन

सोनई (प्रतिनिधी )- आरक्षणाचे जनक , समतेचा पाया रचणारे महामान व लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनई ग्रामपंचायत कार्यालयात माजी सरपंच व शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत गडाख यांच्या हस्ते व सरपंच दादा वैरागर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले.
यावेळी गडाख म्हणाले की शाहू महाराज यांनी दिन दुबळ्याची सेवा करून सामाजिक बंधुभाव, समता, मागासवर्गीय समाजाचा उध्दार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, व आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविले. आज त्यांच्या विचारांचा व विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
यावेळी माजी सरपंच हरिभाऊ दरंदले, सरपंच दादा वैरागर, उपसरपंच संदीप कुसळकर, पत्रकार विजय खंडागळे, ग्रामसेवक निमसे, सदस्य भाऊसाहेब तेलोर, जाळूनाना चांदघोडे, नामदेव तोडमल, भास्कर दरंदले आदी उपस्थित होते.