Breaking News

इंडियन ऑईल कंपनीविषयी संताप


प्रतिनिधी, श्रीरामपूर - इंडियन ऑईल कंपनीच्यावतीने पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक करण्यासाठी जमिनीखालून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यातील जमिनीचे भूसंपादन सुरु करण्यात आले आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांना अवघे १० टक्के भरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे याविषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पढेगाव येथे झालेल्या बैठकीत या भूसंपादनास हरकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

इंडियन ऑईल कंपनीने कायली (गुजरात) नगरमार्गे सोलापूर अशी पेट्रोलियम पाईप लाईन टाकण्याची योजना हाती घेतली आहे. त्याकरिता भूसंपादन सुरु झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कार्यालयात सुरु आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव, सराला, ब्राह्मणगाव वेताळ, माळेवाडी, हरेगाव, वडाळा महादेव, निपाणी वडगाव, कारेगाव, मालुंजा, पढेगाव, लाडगाव येथील शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. 

यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा संभाजी कुंदे, संजय बनकर, चंद्रकांत बनकर, शरद बनकर, तनवीर पटेल, विरेश गलांडे, सुदाम भांड, गणेश चौधरी, प्रमोद बनकर, प्रविण बनकर, अरुण बनकर, तोैफिक पटेल, गोकुळ भालदंड, बाळासाहेब ताके, रेवजी भालदंड, दिलीप भालदंड, युनूस शेख, आशिष दौंड आदींनी या बैठकीत दिला आहे.