Breaking News

श्रीरामपूर येथे बस आगार प्रमुखांना विविध मागण्यासाठी निवेदन

श्रीरामपूर (वार्ताहर)- येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने श्रीरामपूर येथे विद्यार्थ्यांच्या मासिक पासबाबत व विनाथांबा तिकीटासाठी माहिलाना होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन आगर प्रमुख व्यवस्थापक राकेश शिवदे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निखिल सानप यांच्या हस्ते देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयातील वर्गदेखील सुरु झाले आहेत. त्यामुळे एसटी बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मासिक पास काढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. मात्र श्रीरामपूर आगारात एसटी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पास काढण्यासाठी मोठ्या प्रमाणार रांगा लागत आहेत. तसेच विना थांबा गाडीचे तिकीट घेण्यासाठी महिलांना दोन दोन तास रांगेमध्ये उभे रहावे लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करुन विद्यार्थ्याना तात्काळ पास उपलब्ध करुन देण्यात यावेत व महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उघडण्यात यावी. अशी मागणी केली आहे. या निवेदनावर विद्यार्थी शहर अध्यक्ष निरंजन भोसले, तालुका उपाध्यक्ष हर्षल दांगट, सोहेल शेख, सागर वाडीले, आकाश जाधव, शुभम परदेशी, अवधूत गाडे, भारत शिवदे, पंकज जाधव आदींच्या सह्या आहेत.