Breaking News

सदाशिव थोरात यांचे सामजिक कार्य कौतुकास्पद - ना. शालिनीताई विखे

उक्कलगाव ( प्रतिनिधी ) - सदाशिव थोरात यांचे सामजिक कार्य हे कौतुकास्पद आहे. सामजिक जाणीव ठेवत ते विविध सामाजिक कामे करत असतात. असे प्रतिपादन ना. शालिनीताई विखे यांनी केले. त्या कै. सुकदेव लहानु थोरात यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य वाटप प्रसंगी बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती इंद्रभान थोरात होते. या वेळी जि.प. सदस्या आशाताई दिघे, अर्थ बांधकाम वि. अहमदनगर माजी सभापती बाबासाहेब दिघे , गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी, साञळ विद्यालयाच्या उपप्राचार्य जयश्री शिंगणारे, रावसाहेब थोरात, सरपंच नितीन थोरात, उपसंरपच शारदाताई जगधने, बन्सी भाऊ थोरात, मा.उपसंरपच विकास थोरात, चेरमन अॅड. पुरुषोत्तम थोरात, व्हा. शिवाजी थोरात, सदाशिव थोरात, प्रकाश जगधने, बबन थोरात, वंसत थोरात, आबासाहेब सोन्याबापु थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक जनार्दन ठुबे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत वाघ यांनी केले. तर अनुमोदन वाडितके यांनी दिले. यावेळी गावाच्या वतीने जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामचद्र थोरात, प्रकाश थोरात, शा. व्य. सा. दिपक गोसावी, सतोष पगारे, अनिल थोरात, रविद्र जगधने, रविद्र थोरात, गुलाबराव गाडेकर, बाबासाहेब थोरात , कचरु थोरात, शिवाजी थोरात, किशोर थोरात, प्रकाश पारखे, सोमनाथ मोरे, विकास थोरात, उत्तम थोरात, भाऊसाहेब मोरे, निवृत्ती थोरात, नंदू थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाकण वस्ती शाळा, पटेलवाडी शाळा, 110 विद्यार्य्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शेवटी आभार सुनिल थोरात यांनी मानले.