शेतकर्यांना सर्व बँकातून लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
मुंबई - राज्यातील सर्व बँकानी शेतकर्यांना सरळ पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. या पत्रात फडणविसांनी असे म्हटले आहे, की सध्या खरीप पीक घेण्याची वेळ आहे आणि कर्जाचे धीम्या गतीने वितरण झाल्यास ते शेतक र्यासाठी फायद्याचे होणार नाही. सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, की पीक कर्जाच्या वाटपावर लक्ष ठेवा. तथापि राष्ट्रीय आणि खासगी बँकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. पावसाच्या आगमनानंतरही बँक मंद गतीने कर्ज वितरीत करत आहेत. तर राज्य सरकारने ऐतिहासिक कर्ज माफी दिली होती. त्यामुळे आता नव्याने कर्ज घेणार्या शेतकर्यांची संख्या जास्त आहे, असेही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. फडणविसांचे पत्र हे भारतातील शेतकर्यांच्या दहा दिवसांच्या देशव्यापी आंदोलनाच्या आठवड्यानंतर आले आणि जे नंतर एकाएकी संपले. शेतकर्यांनी कर्ज माफ, पिकांसाठी योग्य भाव आणि स्वामीनाथन आयोगाची पूर्तता करण्यासाठी आंदोलन केले होते.