तलावात बुडलेल्या महेश चव्हाणचा मृत्यू संशयास्पद;ते पाच मित्र कोण?
श्रीगोंदा : शहरातील मांडवगण रस्त्यावरील गोविंदराज कॉम्प्लेक्समध्ये राहणारा महेश राजू चव्हाण ( वय 23 वर्षे ) या तरुणाचा श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रीगोंद्यात शोककळा पसरली आहे.
महेश हा दुपारी तीन वाजता मित्रांसोबत या महाविद्यालयात पोहोण्यासाठी गेला होता. पण तो आपले पाच मित्रांसहित पोहत असताना गायब झाला कसा? दूसरी गोष्ट अशी की, त्यावेळी तेथे 40 ते 50 मुलं पोहत होती. परंतु दुपारी 4 वाजता महिलांची बॅच सुरू होणार असल्यामुळे तेथील कर्मचारी मालजप्ते यांनी सर्व मुलांना बाहेर काढले व जलतरण तलाव पुन्हा एकदा चेक केला असता. त्यांना जलतरण तलावाच्या बाजूला बूट व कपडे दिसले, संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता. जलतरण तलावात तळाशी एका तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसले, हा जलतरण तलाव चार दिवसांपूर्वीच पुणे येथील तेजपूल एजन्सीला भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता. परंतु या घटनेबाबत काही तरुण याठिकाणी पाण्यात मस्ती करत असल्याची माहिती समजली. तसेच या ठिकाणी येणार्या तरुणांना पोहोता येते की नाही, त्याला लाईफ जॅकेट दिले का नाही, यावरून जलतरण ठेकेदारावर संशय वाढला आसून जलतरण तलाव आपण ठेकेदारी तत्वावर घेत असताना सुरक्षक जलपटु कोठे होते. मयत मुलाचा मोबाईल कुणी घेतला ती मुले कोण होती? यांचे पुरावे आहेत का? असले तरी या तरुणाचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तरुणांची पाण्यातील मस्ती जीवावर बेतली.
दरम्यान पोलिसांकडून समजलेली माहिती व प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार या ठिकाणी काही तरुण बुडवाबुडवीचा खेळ करून, पाण्यात मस्ती करत होते. तीच मस्ती या तरुणाच्या जीवावर बेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण 24 तास ऊलटून गेल्यानंतरही कुठल्याही गुन्हा नोदविण्यात आला नसल्याने संशयामध्ये वाढ होत आहे. मयत आई वडील यांचे वर कोणत्या राजकीय पुढार्यांचा दबाव आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महेश चव्हाण याने नुकतीच टी.वाय.बी.कॉम. ची परीक्षा दिली होती. आई वडील यांना मानसन्मान देणारा, डोळ्याचे पारणे फेडणारा मुलगा गेल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.