Breaking News

देश बदलतो आहे - प्रदिप लोखंडे

पुणे, दि. 06, मे - आपला देश शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहोत, असे आपण अनुभवत असताना फक्त शहर नजरेसमोर आणतो. कारण आपला दृष्टीकोन मर्यादित आहे. प्रत्यक्षात मात्र देशातील प्रत्येक गाव देखील याच वेगाने बदलत आहे. संपर्कयंत्रणा, शेती, शिक्षण, स्वयंरोजगार गावोगाव उपलब्ध होत आहे. या सर्व खेड्यांना, गावांना बरोबर घेऊन आपला देश बदलत आहे, असे मत प्रदिप लोखंडे यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या छत्रपती शिवाजी वनमालेत ते ’देश बदलतोय मित्रांनो’ या विषयावर ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, भारतामध्ये लाखोंच्या संख्येने प्राथमिक शाळा आहेत, त्यापैकी एखाद्या शाळेत काही अनुचित घडले तर मीडिया दिवसरात्र तेचतेच दाखवतो. त्यामुळे आपण निराश होतो. पण तसे आजिबात नसून अगदी खेडेगावात सुद्धा सर्व विपरीत परिस्थितीवर मात करून उत्तम पद्धतीने शाळा सुरु आहेत. तेथील शिक्षक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरी शाळांप्रमाणेच विद्यार्थी घडवीत आहेत, आपण फक्त यथाशक्ती योगदान देण्याची गरज आहे. किमान त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे.