Breaking News

आचारसंहिता मोडणार्‍यावर ‘इ-नेत्र’चे लक्ष निवडणूक आयोगाकडून नवीन प्लॉन


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पुढील निवडणूका पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी कंबर कसली असून, यापुढे आचारसंहितांचा भंग करणार्‍यावर ‘इ-नेत्र’ या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचे लक्ष राहणार आहे. जर कोणताही नेता निवडणूकांच्या काळात आचारसंहितेचा भंग करत असेल, तर त्याबाबत तक्रार नोंदवता येणार आहे. यासाठी पुरावा म्हणून फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावा लागेल. या पची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिली.
येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता आयोगाच्या आयटी विभागाने एका अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. याची चाचणी चार राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये घेतली जाणार आहे. कर्नाटक निवडणुकीमध्ये बेंगळुरू महानगरपालिकेच्या निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या अ‍ॅप्लिकेशनची तयारी केली होती पण त्यासाठी उशिर झाल्याने खूपच कमी लोकांपर्यंत पोहचता आले. पुढच्या महिन्याभरात नवीन अ‍ॅप्लिकेशन निवडणूक आयोगाकडून लॉन्च करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाले आहे. तिथे निवडणुक ांबद्दल अजून कोणतीच चर्चा झाली नसल्याचे रावत यांनी सांगितले. सरकार पडले असले तरी सदनातील कामकाज स्थगित केले आहे. त्याठिकाणी कोणती आघाडी होऊन पुन्हा सरकार स्थापन होईल की नाही याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही. पोटनिवडणुकांबाबत बोलायचे झाले तर सध्या सरकारकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रानुसार पोटनिवडणुका घेण्यासारखी परिस्थिती काश्मीरमध्ये नाही. यावर निवडणूक अधिकारी काम करत असल्याचेही रावत यांनी सांगितले.