‘पॅनकार्ड क्लब्ज’च्या गुंतवणूकदारांचे 30 जानेवारीला राज्यभर धरणे आंदोलन
सांगली, दि. 25, जानेवारी - सांगली जिल्ह्यातील पाच लाख गुंतवणूकदारांचे पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड कंपनीत सुमारे 350 कोटी रूपये अडकले आहेत. संबंधित गुंतवणूक दारांना त्यांच्या कष्टाचे व हक्काचे हे पैसे तातडीने मिळावेत, या मागणीसाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- ऑर्डिनेशन कमिटीच्यावतीने 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- ऑर्डिनेशन कमिटीचे सचिव एम. बी. मोरे यांनी दिली.
महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तब्बल 55 लाख गुंतवणूकदारांचे सुमारे आठ हजार कोटी रूपये पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड या कंपनीकडे अडकले आहेत. या कंपनीच्या सर्व मालमत्ता तात्काळ विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, असा आदेश 15 मे 2017 रोजी ‘सॅट’ने दिला आहे.
मात्र सध्या ‘सेबी’कडून सुरू असलेल्या मालमत्ता विक्रीची प्रक्रियाच संशयास्पद आहे. या मालमत्तांची किंमत बाजारभावापेक्षा 50 ते 60 टक्क्यांनी कमी केली जात आहे. या कं पनीची सर्व मालमत्ता सील करण्याचा आदेश असताना 84 पैकी केवळ 27 मालमत्ताच सील केल्या गेल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे कोणत्या पध्दतीने ? व कधी मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.
केंद्र शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून गुंतवणूकदारांना न्याय देणे गरजेचे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आठ दिवसात ‘सेबी’कडून अहवाल मागितला होता. आता त्यास महिना झाला तरीही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात संबंधित सर्व यंत्रणांची भूमिका संशयास्पद ठरत चालली आहे.
आपल्या कष्टाचे व हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- ऑर्डिनेशन कमिटीच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा सदस्यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचीही केंद्र अथवा राज्य शासनाने फारशी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. वास्तविक, या कंपनीच्या या सर्व मालमत्ता या गुंतवणूक दारांच्या मालकीच्याच आहेत.
त्यामुळे गुंतवणूकदारांच्यावतीने किमान सहा तज्ञांचा समावेश या लिलाव प्रक्रियेत असावा, गुंतवणूकदारांची नावे व त्यांच्या देय रकमांची यादी तातडीने जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को- ऑर्डिनेशन कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी क ार्यालयासमोर एकाचवेळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील सर्व गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही एम. बी. मोरे यांनी केले आहे.