Breaking News

मृगाच्या पावसामुळे शेतकरी समाधानीः पेरणीच्या कामांना वेग

मृग नक्षत्र लागताच लगेच दुसर्‍या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात सुध्दा गारवा निर्माण झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झाल्याने प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात मशागत करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे सर्वत्र शेतावर मक ा,स्वायबिन,भुईमूग बाजरी,कुळीद पेरणीची कामे जोमाने सुरु झाली आहेत. अनेक शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे,शेती अवजारे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की मका टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकर्‍यांना मका टाकण्यासाठी जमिनीची मशागत करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता. मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकर्‍यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत.तालुक्यातील धुळगाव,सतारे,शेवगे,अंतरवेली,दहेगाव,भटगाव तसेच पिंप्री या भागात यंदा पहिल्याच मृग नक्षत्राने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात 8 जूनपासून पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा एक आठवडा पावसाने लेट हजेरी लावल्याने 23 जून नंतर सगळ्यांना पेरणीची संधी लाभली. धान पेरणीची कामे साधारणत: जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत केलेले उत्तम असते.


यंदा पहिल्याच मृग नक्षत्रात समाधान कारक पाऊस झाल्याने मागच्या वर्षीच्या तुलनेने तब्बल पंधरा दिवस आधी पेरणीला सुरवात केली आहे जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पेरणी केली तरच रब्बीच्या पिकाला मुबलक पाणी मिळते त्यामुळे हीच योग्य वेळ आहे.
संतोष गायकवाड, शेतकरी