Breaking News

आदिवासींच्या जगण्याचे भोग संपेना विकासकामांपासून कोसो मैल दूर


गडचिरोली : राज्याची विकासाच्या दिशेने घौडदोड सुरू असताना गडचिरोलीचा आदिवासी अजूनही मुलभूत समस्यांसाठी झगडत आहे. नक्षलवादी प्रवण क्षेत्र असलेला भाग अद्यापही विकासापासून कोसो मैल दूर आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालींनाही त्यांना तोंड द्यावे लागत आहे. नक्षलवादी स्वत:ला आदिवासींचे तारणहार म्हणवत असले तरी सरकारी विकासकामांना ते खोडा घालत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सरकारने नक्षलविरोधी कारवायांना पायबंद घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार नक्षलवादी आत्मसमर्पण प्रोत्साहन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे नक्षलवादी कारवायांना काही प्रमाणात आळा बसला असला तरी, अद्यापर्यंत समूळ नायनाट करण्यास यश मिळू शकलेले नाही.