पारनेर महाविद्यालयात जागतिक योगदिन साजरा
पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योग दिनाच्या निमित्ताने योग प्रशिक्षक प्रा. दत्तात्रय दळवी, क्रीडा शिक्षक प्रा. संजय गायकवाड, राष्ट्रीय छत्रसेना प्रमुख लेफ्टनंट प्रा. भरत डगळे यांनी विविध आसनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच त्याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, जीवनात सातत्याने योगा केला तर काय फायदा होऊ शकतो, शालेय जीवनात योगाला खूप महत्त्व द्यायला हवे. अभ्यास चांगला होण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक दृष्टया तंदुरस्त राहण्यासाठी सतत योगा करणे ही काळाची गरज आहे.