नविन शैक्षणिक वर्षामध्ये शालेय गणवेशांसह साहित्य दरामध्ये वाढ
नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने, शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत पालकांची गर्दी झाली आहे. कपड्यावर जीएसटी लागल्याने गणवेशाच्या किंमती वाढल्या आहेत. काही व्यापारी एमआरपीनुसार, तर काही व्यापारी एमआरपीपेक्षा कमी किंमतीत वह्यांची विक्री करीत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. नव शैक्षणिक वर्ष असल्याने बाजारात चहलपहल वाढल्याने व्यापारी वर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.
गणवेश 12 टक्क्याने महागले
कपड्यांंवर आता 5 टक्के जीएसटी लागत असल्याने तसेच मालवाहतुक भाडे वाढल्यामुळे 12 टक्क्याने गणवेश महाग झाले आहेत. बाजारात 60 टक्के गणवेश सोलापुर, तर 40 टक्के गणवेश भिंवडी येथून मागविले जातात.असे कापडाचे व्यापारी संजय काकडे यांनी सांगीतले.
सर्वसाधरण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा हाफ शर्ट व हाफ पँट 250 ते 350 रूपयांत, फुल पँट व हाफ शर्ट 400 ते 450 रूपायांत मिळत आहे. 10 वीच्या विद्यार्थ्यांचा फुल पँट व हाफ शर्ट 500 ते 600 रूपयांना मिळत आहेत. तर मुलींचा पंजाबी ड्रेस गणेवश 300 पासुन 500 रूपायांपर्यंत तर, मोठ्या वर्गातील मुलींचा ड्रेस 800 च्या पुढेच विकला जात आहे. यंदा गणवेश महात्मा गांधी व रवी शंकर शाळेन बदले आहेत. इतर शाळांनी गणवेश बदलले नाहीत. गणवेश न बदलले नसल्याने हा पालकांसाठी दिलासा आहे. बाजारपेठेत मुबलक प्रमाणात वह्या उपलब्ध झाल्या आहेत. मात्र काही स्टेशनरी विक्रेते, एमआरपीनुसार तर काही विक्रेते एमआरपीपेक्षा कमी किंमतीत वह्या विकत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दप्तर, कंपास, डबा सर्व काही हवे नवे
नवा वर्ग, नवे शालेय साहित्य यामुळे दप्तर, कंपास, डबा सर्वकाही नवे खरेदी केले जात आहे. खरेदी करताना पालकांसोबत त्यांचे पाल्यही दिसतात. मात्र खरेदी पाल्यांच्या पसंतीनुसार केली जात आहे. यामुळे मात्र तालुक्यात कोट्यावधीची उलाढाल अपेक्षित आहे.