परीट मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी फंड
कोेपरगांव : महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी कोपरगांवचे सुनिल फंड यांची नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी त्यांना सोनई येथील समाज मेळाव्यात नियुक्तीपत्र दिले. राष्ट्रीय परीट समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ बोरसे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या निवडीबददल आ. स्नेहलता कोल्हे, माजी आ. अशोक काळे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, कोसाका उद्योग समुहाचे अध्यक्ष आशुतोष काळे, जि. प. सदस्य राजेश परजणे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण धोबी, बळवंतराव साळुंके,गोविंद राउत आदींनी फंड यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.