Breaking News

लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा थाटात

बुलडाणा, दि. 22 - सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या लॉयन्स क्लब खामगाव या सेवाभावी संस्थेच्या नुतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ व शपथविधी 17  जून रोजी स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे माजी अध्यक्ष अशोक सपकाळ तर शपथविधी  अधिकारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज लॉयन्सचे एम.सी.सी. व लॉ. राजे मुधोजी भोसले माजी प्रांतपाल नागपूर यांची विशेष उपस्थित होते. 
यावेळी प्रमुख वक्ता माजी प्रांतपाल डॉ.अशोक बावस्कर, प्रमुख अतिथी माजी आ. दिलीप सानंदा, अशोक सानंदा आर.सी.अशोक केला, लॉयनेस माजी प्रांतपाल  निर्मला जैन, झेड.सी.डॉ.गणेश पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी नुतन कार्यकारिणीचे लॉयन्स अध्यक्ष उज्वल गोयनका, सचिव अभय अग्रवाल, कोषाध्यक्ष  डॉ.निखील लाठे, लॉयनेस अध्यक्षा निला अग्रवाल, सचिव स्मीता देशमुख, कोषाध्यक्षा निलु चांडक, अध्यक्ष पूजा अग्रवाल, सचिव सुजीतसिंह चव्हाण, कोषाध्यक्ष  तेजस्वी जोशी यांच्यासह सर्व पदाधिकाछयांना एम.सी.सी.लॉ.राजे मुधोजी भोसले यांनी शपथ दिली. सदर कार्यक्रमात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. माजी  अध्यक्ष अशोक सपकाळ यांनी नवनिवार्चीत अध्यक्ष उज्वल गोयनका यांना आसनावर बसविले. यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. तसेच लॉयन्स छत्रीचे गरजुंना वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांला 5100 रु. ची मदत, सहयोग फाऊंडेशन संस्थेला 5100 रु.,  डायबिटीज अवेरनेस करिता लिफलेटचे विमोचन तसेच पेडियोट्रीक कॅन्सर पिडीताला 5100 रु. मदत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी गुरव सर यांना वृक्षमित्र  पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लॉयन्स परिवारातील सदस्यांनी अथक परीर्शम घेतले. कार्यक्रमाचे संचालक देवेंद्र मुणोत व सपना मुणोत तर  आभार अजय अग्रवाल यांनी मानले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.