Breaking News

सुशोभिकरणाच्या नावाखाली अनधिकृतपणे पुतळा उभारणी


राहुरी विशेष प्रतिनिधी : श्रीरामपूर रस्त्यालगतच्या सोसायटी चौकात शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर अण्णासाहेब कदम यांचा उभारलेला पुतळा वाहतुकीला अडथळा ठरत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून सुशोभिकरणाच्या नावाखाली पुतळा आणि त्याजवळील अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून घ्या, अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ कदम आणि आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सार्वजनिक रस्त्यात पुतळा उभारणीस किंवा बांधकाम करण्यास राज्य सरकारला परवानगी देता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह अपील सिव्हिल नंबर (एस) ८५१९/२०१६ च्या ४ च्या पॅरोमध्ये दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. असे असताना देवळालीप्रवरा येथे राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर या रस्त्यालगत देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सोसयटीसमोरअण्णासाहेब कदम यांचा अनधिकृतपणे पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा उभारताना सुप्रीम कोर्टाचे पालन केलेले नसून अवमान केला आहे. सध्या या ठिकाणी सुशोभिकरण करुन मोठ्या प्रमाणात वाहतूकीला अडथळा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे छोट- मोठे अपघातही घडत असतात.